S M L

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार : समीर भुजबळांची पुन्हा चौकशी

Sachin Salve | Updated On: Feb 26, 2015 11:42 AM IST

sameer bhujbal 44426 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराप्रकरणी ऍन्टी करप्शन ब्युरोनं राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केलीय. याच संदर्भात वरळीतील ऍन्टी करप्शनच्या ऑफिसमध्ये बुधवारी आमदार समीर भुजबळ यांची जवळपास तीन तास चौकशी करण्यात आलीये.

ही चौकशी सुरू असतानाच भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनीही ऍन्टी करप्शनच्या ऑफिसला भेट दिली. यावेळी किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्या विरोधातील आणखी काही पुरावे ऍन्टी करप्शन ब्युरोला दिल्याच सांगितलंय. भुजबळ जर चौकशीसाठी येत नसतील तर त्यांना ऍन्टी करप्शन ऑफिसला आणून चौकशी करावी. मात्र छगन भुजबळांनी काहीही केलं तर त्यांनी कधी ना कधी अँन्टी करप्शनच्या चौकशीला सामोर जावचं लागेल असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2015 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close