S M L

गोसीखुर्द घोटाळ्या प्रकरणी 'एसीबी'कडे तक्रार

Sachin Salve | Updated On: Feb 26, 2015 08:51 PM IST

गोसीखुर्द घोटाळ्या प्रकरणी 'एसीबी'कडे तक्रार

26 फेब्रुवारी : विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कंत्राटदरांच्या संगनमतामुळे झालेल्या घोटाळ्यासंदर्भात जनमंच या एनजीओनं नागपूरच्या अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केलीये. या प्रकल्पातला घोटाळा जनमंचनंच उघड केला होता.

विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कंत्राटदरांच्या संगनमतामुळे हा घोटाळा झाल्याचं जनमंचचे अध्यक्ष ऍड. अनिल किल्लोर यांनी तक्रारीत म्हटलंय. 2008 ते 2010 या काळात गोसीखुर्द प्रकल्पात अनेक टेंडर्स विदर्भ जलसिंचन महामंडळचे अधिकारी आणि कंत्राटदारांच्या साटेलोटे दिले गेलेत, महत्वाच म्हणजे काम न करता पैसै दिल्या गेलेत, असा दावा जनमंचानं केलाय. कुठलेही पात्रता नसतांना या कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं, इतकंच नाही तर प्रतिस्पर्धी कंपन्याही बनावट दाखवण्यात आले होते. महत्वाच म्हणजे जनमंचान जवळपास 3134 पांनाचे पुरावे एसीबीला सादर केलेत. आघाडी शासनाच्या काळात अनेक सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश युती सरकारनं दिले आहेत. मात्र या प्रकल्पामध्ये गोसीखुर्द प्रकल्पाचा समावेश नाही. अँटी करप्शन ब्युरोनं यावर कारवाई केली केली तर हायकोर्टात परत जाण्याची मुभा आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2015 08:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close