S M L

मनसेचा पुन्हा राडा, इंग्रजी पाट्यांना फासलं काळं

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2015 01:57 PM IST

मनसेचा पुन्हा राडा, इंग्रजी पाट्यांना फासलं काळं

27 फेब्रुवारी : एकीकडे मराठी दिन साजरा होत आहे तर दुसरीकडे मनसेनं आजच्या दिनाचं औचित्य साधून ठाण्यात राडा केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुनः एकदा दुकानांच्या मराठी पाट्यांच्या विषयावर आंदोलन करून इंग्रजी भाषेतील नावाला काळे फासण्यात आलंय.

ठाण्यातील ग्रीन रोडवरील इंग्रजी भाषेत असलेल्या हॉटेल आणि दुकानांच्या पाट्यांना काळा रंग लावून मनसेने पुनः आंदोलन छेडलंय. मनसेच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री आंदोलन करून ठाण्यातील सर्वच दुकानदाराना आपल्या नावाच्या पाटया मराठी भाषेत करण्याचं आवाहनही केलंय. सुरूवातीच्या काळात मनसेने राज्यात अनेक ठिकाणी मराठी पाट्यांसाठी अनेकदा आंदोलनं केली होती आता मराठी भाषा दिनानिमित्त पुनः एकदा मनसे आक्रमक पवित्र्यात दिसत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2015 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close