S M L

बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात पवार नाहीत !

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2015 05:00 PM IST

pawar_mca27 फेब्रुवारी : बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. एन श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातलीये. त्यामुळे आता शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा रंगली होती. मात्र आता खुद्ध शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय.

राजकारणापाठोपाठ शरद पवार यांनी क्रिकेटच्या मैदानावरही इनिंग पेश केली होती. मोठ्या विश्रांतीनंतर शरद पवार नव्याने कमबॅक करण्याच्या तयारीत होते. यावर्षी ईस्ट झोनचे ते अध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. एन.श्रीनिवासन यांची ईस्ट झोनवर चांगली पकड आहे. पण त्यांनी माघार घेतल्यास शरद पवार पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात. याअगोदर शरद पवार यांनी बीसीसीआयचं 2005 ते 2008 दरम्यान अध्यक्षपद भूषवलंय. सध्या ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अशातच त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एजीएमच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवत मागच्या दोन बैठकींना उपस्थिती लावलीये. आणि यापुढच्या दोन्ही बैठकीचं प्रतिनिधित्वही करणार असल्याचा दावा पवारांनी केलाय. पण आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2015 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close