S M L

पाथर्डी तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपपत्र दाखल

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2015 05:06 PM IST

pathardi dalit murder case27 फेब्रुवारी : पाथर्डी तिहेरी हत्याकांडाप्रकरणी 3 आरोपींविरोधात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यांच्याविरोधात 1769 पानांचं आरोपपत्र पाथर्डी इथल्या प्रथम वर्ग कोर्टात दाखल करण्यात आलं. या प्रकरणाचा अजून तपास सुरू असल्यानं गरज पडल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल अशी माहिती तपास अधिकार्‍यांनी दिलीये.

अहमदनगर जिल्ह्याती पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा इथं 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्री संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील संजय जाधव यांची हत्या करण्यात आली होती. या दलित हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. आधी हे हत्याकांड दलित-सवर्ण वादातून घडल्याच्या संशयाने आरोपीविरुद्ध अँट्रोसिटीचे कलम लावण्यात आले होते. पोलिसांची तब्बल 11 पथके या हत्यांकाडाच्या तपासासाठी पाठविली होती. तब्बल तीन महिने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके यांनी पाथर्डीत तळ ठोकला होता. घटनेचा संपूर्ण तपास आणि नार्को चाचणीनंतर आरोपी जवळचे असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी प्रशांत जाधव आणि त्यानंतर अशोक आणि दिलीप जाधवला अटक केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2015 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close