S M L

कोल्हापूर बँक प्रकरणी मुश्रीफ-कोरेंची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2015 07:56 PM IST

कोल्हापूर बँक प्रकरणी मुश्रीफ-कोरेंची संपत्ती जप्त होण्याची शक्यता

27 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 147 कोटी रुपयांच्या नुकसानीप्रकरणी आता राजकीय मातब्बत अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, यांच्यासह 28 संचालकांचा समावेश आहे.

जिल्हा बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 18 संचालकांनी आपल्या मालमत्तेचं प्रतिज्ञापत्र सादर केलंय. पण उरलेल्या 28 संचालकांनी सादर न केल्यानं त्यांच्या मालमत्तेवर आता जप्ती येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेकडून विनातारण आणि नियमबाह्य कर्जपुरवठा करण्यात आला होता. त्यावर बँकेच्या आजी माजी संचालकांची चौकशी झाल्यावर 147 कोटी रुपयांची जबाबदारी या संचालकांवर निश्चित करण्यात आलीय. त्यात अनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यातच सहकारमंत्री चंद्रकात पाटील यांनीही कारवाईला स्थगिती दिलेली नाही तर काही संचालकांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगितीसाठी प्रयत्न सुरू केलेत. त्याबाबतची पुढची सुनावणी आता 3 मार्चला होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2015 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close