S M L

अरूण साधूंचा जनस्थान पुरस्कारानं गौरव

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2015 09:54 PM IST

अरूण साधूंचा जनस्थान पुरस्कारानं गौरव

sadhu33427 फेब्रुवारी : मराठी साहित्यातला सर्वोच्च जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरूण साधू यांना प्रदान करण्यात आलाय. नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साधूंचा सन्मान करण्यात आलाय. एक लाख रूपये रोख, ब्रॉझची सूर्यमूर्ती आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून हा पुरस्कार सुरू झालाय. नाशिकमधल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 1991पासून दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यावेळी भाषणात साधू यांनी मराठी भाषेच्या भवितव्याविषयी तसंच रोजगार निर्मितीच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित केल्या.  मराठी साहित्यात बहुमोल योगदान देणार्‍या साहित्यिकाला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक,डॉ.जब्बार पटेल, ग्रंथाली प्रकाशनाचे दिनगर गांगल हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2015 08:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close