S M L

राष्ट्रवादी समोर बंडखोरांचं आव्हान

23 सप्टेंबर राष्ट्रवादीची यादी जाहीर झाल्यावर लगेचच पक्षातल्या बंडखोरांनी डोकं वर काढलं आहे. आमदार सुधाकर परिचारक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात बंडाचा गजर केला आहे. एका कार्यकर्त्यानं तर आत्मदहनाचाच प्रयत्न केला. पंढरपूर नगरपरिषदेतील नगराध्यक्षासह 28 नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजिनामे दिलेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडं आपले राजीनामे सोपवलेत. विजयसिंह मोहिते पाटील यांची पंढरपुरमधून उमेदवारी जाहिर झाल्यानंतर परिचारक समर्थक संतापले आहेत. दरम्यान परिचारक समर्थकांनी पंढरपूर बंदची हाक दिली आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या खेडचे आमदार दिलीप मोहिते यांंनी मंगळवारीच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिरुरचे भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुनही त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे पाचर्णे अजित पवारांना जाब विचारण्यासाठी समर्थकांसह बुधवारी बारामतीला जाणार आहेत. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधून तिकीट मिळण्याची शक्यता मावळल्यानं राष्ट्रवादीचे विलास नांदगुडे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यवतमाळमधील मनोहर नाईक हे राष्ट्रवादीचे पुसद मधून उमेदवार आहेत. त्यांचेच पुतणे आणि युवा नेते निलय नाईक हेही या पुसदमधून इच्छुक आहे. यावेळी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढण्याच्या हालचालीही त्यांनी सुरू केल्या आहेत, त्यामुळं नाईक घराण्यातच लढाई रंगण्याची चिन्हं आहेत. दरम्यान बंडखोरीच्या भितीनेच काँग्रेस आपली उमेदवारी यादी जाहीर करण्याला उशीर करत आहे. मंगळवारी रात्री आघाडीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आपले उमेदवार घोषीत करेल अशी अपेक्षा होती. मात्र यादी 10 जनपथला पोहोचूनही नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. फॉर्म भरण्याची मुदत संपायला दोन दिवसच बाकी असताना, अजूनही यादी जाहीर होत नसल्याचं पाहून काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2009 10:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2009 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close