S M L

भारताची विजयी हॅटट्रिक, यूएईला स्वस्तात गुंडाळलं

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2015 10:24 PM IST

भारताची विजयी हॅटट्रिक, यूएईला स्वस्तात गुंडाळलं

28 फेब्रुवारी : वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयीरथ सुसाट निघाला असून आज युएईचा स्वस्तात पराभव करून धोणी ब्रिगेडने हॅटट्रिक साधलीये. टीम इंडियाने यूएईचा 8 विकेटनं दणदणीत पराभव केलाय. या विजयासह टीम इंडिया पाँईट टेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहचलीये.

नवख्या यूएईने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाच्या तुफान मार्‍यापुढे यूएईच्या बॅट्समननं नांगी टाकली. त्यांचा एकही बॅट्समन आज तग धरू शकला नाही. यूएईतर्फे शैमान अन्वरनं सर्वाधिक 35 रन्स केले. भारतातर्फे आज आर. अश्विननं कमाल करत 4 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजानं आणि उमेश यादवनं 2 विकेट घेतल्या. मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी ऐवजी टीममध्ये जागा पटकावलेल्या भुवनेश्वर कुमारनंही 1 विकेट घेतली. यूएई टीम अवघ्या 102 रन्सवर गारद झाली. 103 रन्सचं माफक आव्हानाचा पाठलाग करणार्‍या भारताची सुरुवात थोडी अडखळती झाली. शिखर धवन 14 रन्सवर आऊट झाला. पण त्यानंतर रोहित शर्मानं फटकेबाजी करत शानदार होफ सेंच्युरी ठोकली. तर विराट कोहलीनं 33 रन्स केले. भारताने 19 व्या ओव्हरमध्ये मॅच खिश्यात घालून विजयी हॅटट्रिक साधली. या विजयाबरोबर टीम इंडियानं पॉईंट टेबलमधील आपलं पहिलं स्थान चांगलंच भक्कम केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2015 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close