S M L

बजेट : काय मिळालं बळीराजाला ?

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2015 09:48 PM IST

बजेट : काय मिळालं बळीराजाला ?

28 फेब्रुवारी : पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सुतोवाच केल्याप्रमाणे अर्थमंत्री अरूण जेटलींनी कृषी क्षेत्राला आगामी काळात तब्बल 8.5 लाख कोटींपर्यंत पतपुरवठा उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीये. तसंच पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंसाठी 5300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही तरतुदींचा शेतकर्‍यांना थेट फायदा मिळणार आहे. पण शेतकर्‍यांसाठी म्हणून कोणतीही नवी योजना या बजेटमधून आताच्या घडीला दिसत नाहीये. ग्रामीण भागासाठी मात्र, या बजेटमध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि कोणत्या नव्या योजना जाहीर करण्यात आल्यात.

काय मिळालं ग्रामीण भागाला ?

- कृषी पतपुरवठ्यामध्ये 8.5 लाख कोटींपर्यंत वाढ

- पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी 5300 कोटींची तरतूद

- ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी नाबार्डकडे 25 हजार कोटींच्या फंडची स्थापना

- दीर्घकालीन कृषी कर्ज निधीसाठी 15,000 कोटींची तरतूद

- शॉर्ट टर्म कॉओपरेटिव्ह रूरल क्रेडिट रिफायनान्स फंडसाठी 45000 कोटींची तरतूद

- रिजनल रूरल बँक रिफायनान्स फंडसाठी 15000 कोटींची तरतूद

- मनरेगासाठी 34,699 कोटींची तरतूद; 5 हजार कोटींची वाढ

- मातीचा पोत सुधारण्यासाठी आणि ठिबक सिंचनासाठी 5,300 कोटींची तरतूद

- लघु-उद्योगांसाठी मुद्रा बँकेची स्थापना, 20 हजार कोटींची तरतूद

- मुद्रा बँकेद्वारे कर्ज देताना SC/ST वर्गांना प्राधान्य

- पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेनुसार गरिबांसाठी 2 लाखांचा अपघात विमा, दरमहा फक्त 1 रुपया हप्ता

- गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना

- ग्रामीण भागात 4 कोटी घरं बांधणार

- विविध योजनांचे अनुदान लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा करणार

- अटल पेन्शन योजनेसाठी सरकार 50 टक्के अनुदान करणार

- ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजागारक्षम करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2015 09:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close