S M L

सोनम कपूरला स्वाइन फ्लूची लागण!

Samruddha Bhambure | Updated On: Mar 1, 2015 06:31 PM IST

सोनम कपूरला स्वाइन फ्लूची लागण!

01 मार्च : देशभरात स्वाईन फ्लूचा कहर वाढतच चालला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. सोनमला तातडीने राजकोटहून मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. तिला अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गुजरातमधील राजकोटमध्ये तिच्या आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'चं शूटिंग करत होती. शूटिंगदरम्यान सोनम कपूरला सर्दी खोकल्याच्या त्रास सुरू झाला होता. त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये तिला स्वाईन फ्लू झाल्याचं समोर आलं. या चित्रपटात सोनम कपूरसह सलमान खानही प्रमुख भूमिकेत आहे.

दरम्यान, सोनम कपूरला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने बॉलिवूड हादरलं आहे. त्यातच दबंग सलमान खानलाही स्वाईन फ्लू झाल्याच्या चर्चांना उधान आलं होती. पण सुदैवाने सलमानची स्वाईन फ्लू टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे सलमानसह त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. देशभरात सध्या स्वाईन फ्लूचा फैलाव वाढत आहे. स्वाईन फ्लूने देशभरात एक हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. तर तब्बल 15 हजारापेक्षा जास्त जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2015 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close