S M L

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन दालमियांची निवड?

Samruddha Bhambure | Updated On: Mar 2, 2015 02:39 PM IST

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन दालमियांची निवड?

01 मार्च : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा जगमोहन दालमिया यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बोर्डाच्या नव्या कार्यकारिणीसाठी उद्या चेन्नईत निवडणूक होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचक आणि अनुमोदक म्हणून पूर्व विभागाच्या किमान दोन संघटनांचा पाठिंबा आवश्यक असतो. यंदा अध्यक्षपदाचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार पूर्व विभागाच्या बंगाल, त्रिपुरा, आसाम, झारखंड, ओडिशा आणि नॅशनल क्रिकेट क्लब या सहा राज्य संघटनांकडे आहे. दालमियांना या सहाही संघटनांनी लिखित पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या या शर्यतीत एन.श्रीनिवासन यांनी जगमोहन दालमियांना हाताशी धरून शरद पवारांना चांगलाच दणका दिला आहे.

श्रीनिवासन यांच्यावर सुप्रीम कोर्टानं बंदी घातल्यानंतर आता जगमोहन दालमिया यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. उद्या (सोमवारी) चेन्नईत बीसीसीआयची वार्षिक नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. यात दालमियांच्या नावाची अध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा केली जाईल.

दरम्यान, बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या इतर आठ पदांसाठी पवार आणि श्रीनिवासन यांच्या गटांत चांगलीच चुरस रंगण्याची शक्यता आहे. उद्या होणार्‍या वार्षिक सभेत बोर्डाचे पाच उपाध्यक्ष, तसंच सचिव, संयुक्त सचिव आणि खजिनदार या पदांसाठी मतदान होईल तर उपाध्यक्षपदासाठीही श्रीनिवासन आणि शरद पवार यांचे कॅम्प आमनेसामने आले आहेत. श्रीनिवासन आणि शरद पवार यांच्या विश्वासू सहकार्‍यांनी चारही झोनमधून उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. उपाध्यक्षपदाच्या पाच जागांसाठी श्रीनिवासन गटाचे उमेदवार

 • साऊथ झोन : जी. गंगाराजू
 • वेस्ट झोन : टी. सी. मॅथ्यू
 • ईस्ट झोन : गौतम रॉय
 • सेंट्रल झोन : सी. के. खन्ना
 • नॉर्थ झोन : एम. एल. नेहरू

उपाध्यक्षपदासाठी पवार गटाचे तीन उमेदवार

 • वेस्ट झोन : रवी सावंत
 • सेंट्रल झोन : ज्योतिरादित्य सिंदिया
 • नॉर्थ झोन : एम. पी. पांडोव्ह

सचिवपदाची लढत :

 • संजय पटेल विरुद्ध अनुराग ठाकूर

संयुक्त सचिव :

 • अमिताभ चौधरी विरुद्ध चेतन देसाई

खजिनदार :

 • अनिरुद्ध चौधरी विरुद्ध राजीव शुक्ला

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2015 07:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close