S M L

भूसंपादन वटहुकुमाविरोधात अण्णा काढणार पदयात्रा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 2, 2015 07:35 PM IST

anna jantarmant02 मार्च :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे भू-संपादन विधेयकावरून मोदी सरकारला झटका देण्याच्या तयारीत आहेत. अण्णा हजारे येत्या काही दिवसात वर्ध्यातील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमापासून थेट दिल्लीपर्यंत पदयात्रा काढणार आहेत. भू-संपादन विधेयक हे कसे शेतकरी विरोधी आहे हे सांगण्यासाठी आणि शेतक र्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही पदयात्रा काढली जाणार आहे. त्यामुळे मजल-दरमजल करत, ते अडीच महिन्यांनी 1100 किलोमिटरचं अंतर कापून दिल्लीत जंतरमंतर इथे पोहोचतील.

तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची या विधेयकावरून मनधरणी केल्यानंतरही पाठिंबा देण्यास विरोध कायम ठेवला आहे. या विधेयकाबाबत एनडीए घटकपक्षांची बैठक बोलावली जावी अशी भूमिका उद्धव यांनी मांडली आहे. दरम्यान, मोदी सरकारने सादर केलेल्या भू-संपादन विधायकाला भाजप वगळता सर्वच पक्षांनी विरोध केला आहे. मित्रपक्ष अकाली दल आणि शिवसेनेनंही विरोध दर्शवला आहे. मात्र, मोदी सरकारने हे विधेयक उत्तम असून याप्रकरणी बॅकफूटवर जाण्याचे काहीच कारण नसल्याचं सांगितलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2015 07:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close