S M L

भारत-पाकमध्ये आजपासून सचिव स्तरावरची चर्चा

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2015 01:46 PM IST

भारत-पाकमध्ये आजपासून सचिव स्तरावरची चर्चा

03 मार्च : भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या 7 महिन्यांपासून थांबलेली चर्चा आज पुन्हा सुरू होतेय. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर इस्लामाबादमध्ये आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाचे सल्लागार सरताज अझिझ यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांशी ते चर्चा करणार आहे. हुरियतशी चर्चा केल्याच्या कारणांवरून भारतानं ही चर्चा थांबवली होती. 26/11 चा खटला, लखवी प्रकरण, दहशतवाद यांच्यासह आर्थिक मुद्यांवरही चर्चा होणार आहे. पाकिस्तान भारताला 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा देण्याची शक्यता आहे त्या विषयावरही चर्चा होईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2015 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close