S M L

ठाणे विनयंभग प्रकरणी मुजोर रिक्षाचालक अटकेत

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2015 02:11 PM IST

ठाणे विनयंभग प्रकरणी मुजोर रिक्षाचालक अटकेत

thane auto34303 मार्च : ठाण्यात दोन तरुणीसोबत टपोरीगिरी करणार्‍या रिक्षाचालकाच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. नौपाडा पोलिसांनी फुलचंद गुप्ता या रिक्षाचालक आरोपीला अटक केलीय. या आरोपीची रिक्षाही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

रत्नागिरीत राहणार्‍या दोन मुली रविवारी ठाण्याच्या नौपाडा भागात फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी भिवंडी येथील आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी दोघींनी ठाण्यातून रिक्षा केली. रिक्षेत बसल्याच्या काही वेळानंतर रिक्षावाला मुलींकडे पाहून अश्लील हावभाव करु लागला. हा प्रकार लक्षात येताच दोन्ही मुलींनी रिक्षावाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली. पण रिक्षावाल्याने त्यांचं म्हणणं न ऐकता जोरात रिक्षा चालवायला सुरुवात केली. शेवटी घाबरलेल्या या दोन्ही मुलींनी आपला जीव वाचवण्यासाठी कॅडबरी पुलाजवळ रिक्षेतून उडी मारली. या मुलींना तत्काळ ज्यपिटर हॉस्टिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात  रिक्षाचालकावर अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या टपोरी रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पाच टीम तैनात करण्यात आल्या होत्या. अखेर आज तिसर्‍या दिवशी फुलचंद गुप्ता या रिक्षाचालकाला अटक करण्यात आलीये. काहीदिवसांपूर्वी स्वप्नाली लाड या मुलीनेही रिक्षावाल्यापासून जीव वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली होती. स्वप्नाली लाड प्रकरणाशी काही संबंध आहे का ? याचाही तपास पोलीस करत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2015 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close