S M L

रेपो रेटमध्ये कपात, गृह कर्जधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Mar 4, 2015 10:17 AM IST

रेपो रेटमध्ये कपात, गृह कर्जधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता

04 मार्च :  रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज (बुधवारी) पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली असून, रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. यामुळे गृह कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी रेपो दर 7.75 टक्के होता. आता तो 0.25 टक्क्यांनी कमी करून 7.50 टक्के करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात दुसर्‍यांदा कपात करण्यात आली आहे. याआधी जानेवारी महिन्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कमी करून 7.75 टक्के करण्यात आला होता.

आरबीआयने रेपो दरात कपात केली असली तरी, 'कॅश रिझर्व्ह रेशो' (सीआरआर) 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. रेपो दरांमधील कपातीमुळे गृह कर्जधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2015 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close