S M L

सेन्सेक्सचा नवा उच्चांक, पहिल्यांदाच पार केला 30 हजारांचा टप्पा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 4, 2015 02:32 PM IST

04 मार्च : रिझर्sensex1व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करताच, मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतली. सेन्सेक्सने पहिल्यांदाच विक्रमी 30 हजारांचा टप्पा गाठला.

आरबीआयने आज रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानंतर लगेचंच त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर दिसून आला.

सेन्सेक्सने आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच 30 हजाराचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीनेही ऐतिहासिक नोंद केली. निफ्टीने 9084 अकांचा टप्पा गाठला.

गेल्या अडीच महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेकडून दुसर्‍यांदा रेपो दरांमध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे गृहकर्जधारक आणि सामान्य गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2015 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close