S M L

सेनेचं हे वागणं बरं नव्हे -दानवे

Sachin Salve | Updated On: Mar 4, 2015 05:38 PM IST

सेनेचं हे वागणं बरं नव्हे -दानवे

danve on sena3404 मार्च : भूसंपादन विधेयकावर शिवसेनेचे जे काही आक्षेप आहेत ते नोंदवून घेण्यात आले आहे. जरी त्यांचं यावर समाधान होत नसेल तर त्यांनी संसदेत आपलं मत मांडावं पण, सत्तेत राहून आंदोलन करणं हे चुकीचं आणि बरं नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलीय. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असं उद्धव ठाकरे यांनी बजावून सांगितलंय.

भूसंपादन विधेयकावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये अजूनही एकवाक्यता झालेली नाही. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी शिवसेनेचा भूसंपादन विधेयकाला का विरोध आहे यावर चर्चा केली. मात्र, या बैठकीनंतरही काही तोडगा निघू शकलेला नाही. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन सेनेच्या विरोधावर टीका केली. शिवसेनेचे जे काही आक्षेप होते ते नोंद करून घेण्यात आलीये. प्रत्येक आक्षेपावर नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. पण तरीही त्यांचं समाधान झालं नसेल तर त्यांनी संसदेत आपली भूमिका मांडावी. जर त्यांची भूमिका योग्य असेल तरी स्वीकारली जाईल असं दानवे यांनी स्पष्ट केलं. तसंच एकीकडे सत्तेत राहायचं आणि दुसरीकडे सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलनं करायची हे बरोबर नाही असंही दानवे म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत नाही असं बजावून सांगतआम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असंही स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2015 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close