S M L

तृप्ती माळवींची अखेर हकालपट्टी, पण राजीनामा देण्यास नकार !

Sachin Salve | Updated On: Mar 4, 2015 07:19 PM IST

trupti malvi44404 मार्च : लाच प्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची अखेर हकालपट्टी करण्यात आलीये. आज राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय झालाय.

30 जानेवारीला माळवी यांना लाच घेताना पकडलं होतं. माळवी यांनी पदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीये. मात्र, तृप्ती माळवी यांनी राजीनामा देण्यास नकार दिलाय.

शिवाजी पेठेत जमीन हस्तांतरीत प्रकरणी संतोष पाटील यांच्याकडून तृप्ती माळवी यांच्या स्वीय सहाय्यक अश्वीन गडकरी यांनी 40 हजारांची लाच मागितली होती. पाटील यांनी 16 हजार रुपये गडकरी यांना दिले त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी माळवी आणि गडकरींना रंगेहाथ पकडलं होतं. या प्रकरणी तृप्ती माळवी यांना 30 जानेवारीला ताब्यात घेण्यात आलं होतं.

त्यानंतर त्यांना 5 फेब्रुवारीला अटक करुन त्याच दिवशी त्यांना कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं जामीनही मंजूर केला होता. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेची विशेष महासभेमध्ये महापौर तृप्ती माळवी या आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता होती. पण 16 फेब्रवारी रोजी माळवी राजीनामा देणार असं स्पष्ट केलं होतं. अखेरीस पक्षाची बदनामी होत असल्याचं कारण देत माळवींची हकालपट्टी करण्यात आलीये. मात्र, तृप्ती माळवी यांची हकालपट्टी झाली असली तरी राजीनामा देण्यास नकार दिलाय. आपण आपल्या महापौरपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार असा दावा माळवी यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2015 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close