S M L

मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय निंदणीय, एमआयएमची टीका

Sachin Salve | Updated On: Mar 5, 2015 06:59 PM IST

मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय निंदणीय, एमआयएमची टीका

owasis on gov05 मार्च : राज्य सरकारने मुस्लीम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर एमआयएम संघटनेनं तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

सरकारने एक अध्यादेश काढून आरक्षण हटवणे हा संपूर्ण समाजावर झालेला अन्याय आहे आणि आम्ही याची निंदा करतो अशी जळजळीत प्रतिक्रिया एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली.

तसंच याआधीच आम्ही नोकरीतील 5 टक्के मुस्लीम आरक्षण हटवण्यावर एक चळवळ उभी केली होती. याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर सभादेखील घेत होतो, सरकारलाही विंनंती केलीये.

आम्ही कोर्टातही जाणार होतो आणि अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून देखील हाच निर्णय येणे हे केवळ एका समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब आहे', असं मतंही जलील यांनी व्यक्त केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2015 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close