S M L

निर्भया डॉक्युमेंटरी : केंद्राची बीबीसीला नोटीस

Sachin Salve | Updated On: Mar 5, 2015 11:48 PM IST

निर्भया डॉक्युमेंटरी : केंद्राची बीबीसीला नोटीस

bbc 456565605 मार्च : निर्भयावर तयार केलेली डॉक्युमेंटरी दाखवल्याबद्दल केंद्र सरकारने बीबीसीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ही डॉक्युमेंटरी दाखवू नये यासाठी केंद्र सरकारने बुधवारी रात्रीपर्यंत प्रयत्न केले. पण ते प्रयत्न अपुरे ठरले. मात्र, केंद्र सरकारने टाकलेल्या दबावामुळे युट्यूबनंही ही डॉक्युमेंटरी आता काढून टाकलीय. ही डॉक्युमेंटरी दाखवली जाऊ नये यासाठी बुधवारी रात्रीपर्यंत सरकारकडून प्रयत्न करण्यात आले खरे, पण बीबीसीनं डॉक्युमेंटरी दाखवली. पण भारत सरकारच्या म्हणण्याप्रमाणे भारतात डॉक्युमेटंरी न दाखवण्याची ग्वाही बीबीसीनं दिली आहे.

बीबीसीच्या पत्रकार लेस्ली उड्विन यांनी निर्भया प्रकरणावर तयार केलेली इंडियाज डॉटर या डॉक्युमेंटरीच्या प्रसारणावरची बंदी कायम असल्याचं दिल्ली कोर्टाने स्पष्ट केलंय. पण, ही डॉक्युमेंट्री ब्रिटनमध्ये पहाटेच बीबीसीनं दाखवलीये. होळीच्या दिवशी ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात येणार होती. पण, भारतात सरकारने डॉक्युमेंटरीच्या प्रसारणावर बंदी घातल्यानंतर बीबीसीने यूकेमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेतीन वाजताच ही डॉक्युमेंटरी दाखवलीय. या डॉक्युमेंटरीसाठी उड्विन यांनी तिहार तुरुंगात जाऊन या प्रकरणातला एक दोषी मुकेश सिंह यांची मुलाखत घेतली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2015 11:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close