S M L

अमित शहा-भागतवतांची मॅरेथॉन बैठक सुरू

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2015 08:20 PM IST

अमित शहा-भागतवतांची मॅरेथॉन बैठक सुरू

amit shah and bhagwat06 मार्च : दिल्ली विधानसभेत पराभवानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा आज नागपुरात दाखल झाले असून सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांची सध्या मॅरेथॉन बैठक सुरू आहे.

अमित शहा आज सकाळी नागपुरात दाखल झालेत. भागवत यांच्या सोबत सुरू असलेल्या बैठकीला सरकार्यवाह भैयाजी जोशीही उपस्थित आहेत. या महिन्यात होणार्‍या संघाच्या प्रतिनिधी सभेच्या संदर्भात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तसंच मुफ्ती मोहम्मद यांनी पाकबाबत केलेल्या वक्तव्यावरून संघात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे या बैठकीत या मुद्द्यावरही चर्चेची शक्यता आहे. तसंच दिल्लीत झालेल्या पराभव आणि जम्मू आणि काश्मिरमध्ये सरकार स्थापनेबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2015 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close