S M L

बेळगावच्या महापौर-उपमहापौराची आज निवड

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2015 01:12 PM IST

बेळगावच्या महापौर-उपमहापौराची आज निवड

belgum palika07 मार्च : बेळगाव महापालिका महापौर उपमहापौर पदाच्या निवडप्रक्रियेला थोड्यावेळापूर्वीच सुरुवात झालीये. या निवडणुकीत मराठी गटाकडून नगरसेवक किरण सायनाक, मोहन बेलगुंदकर आणि विनायक गुंजतकर हे महापौरपदासाठी तर उपमहापौर पदासाठी नगरसेविका मीना वाझ माया कडोलकर इच्छुक आहेत तर कानडी उर्दू गटाकडून महापौरपदासाठी दीपक जमखंडी तर उपमहापौर पदासाठी जयश्री मलगी इच्छुक आहेत.

पालिकेत एकूण 58 नगर सेवक व्यतिरिक्त 4 आमदार आणि एका खासदाराला मतदानाचा अधिकार आहे. एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील हे आमदार आणि नगरसेवक देखील आहेत. त्यामुळे एकूण मतदान संख्या 62 आहे. आज सकाळी 11 वाजता अर्ज भरण्यात आले. 1 वाजता सभागृहात मतदानाद्वारे महापौर उपमहापौर निवडण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2015 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close