S M L

पुणे : दहावीची परीक्षा वार्‍यावर, शाळेत लग्नकल्लोळ सुरूच !

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2015 03:29 PM IST

 पुणे : दहावीची परीक्षा वार्‍यावर, शाळेत लग्नकल्लोळ सुरूच !

07 मार्च : दहावीची महत्वाची परीक्षा असताना दहावी-बारावी बोर्डाचे नियम पायदळी तुडवत उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात लग्न व स्वागत समारंभाची तयारी सुरू आहे. आज इंग्रजीचा महत्वाचा पेपर आहे. या लग्नासाठी येणार्‍या गाड्यांचं पार्किंग शाळेच्या मैदानावर करण्यात येतंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: या लग्नाला हजर राहणार असल्याचं समजतंय. आयबीएन लोकमतने सर्वप्रथम ही बातमी उघडकीस आणली, पण राष्ट्रवादीचे माजी नेते असलेल्या महादेव कांचन यांनी शिक्षण विभागाच्या नियमांनाही न जुमानता याच ठिकाणी सोहळ्याचं आयोजन केलंय.

या प्रकरणी शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली होती. पण, शिक्षण विभागानं मुख्यध्यापकांना मागितलेला खुलासा अद्यापही मिळालेला नाही.

==================================================================================

संबंधित बातम्या

…या शाळेत दहावीच्या परीक्षेत शाही लग्नाचं विघ्न !

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2015 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close