S M L

बेळगाव पालिकेवर मराठी झेंडा, महापौरपदी किरण सायनाक

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2015 09:07 PM IST

बेळगाव पालिकेवर मराठी झेंडा, महापौरपदी किरण सायनाक

07 मार्च : बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा मराठी झेंडा फडकलाय. महापौर आणि उपमहापौरपदी मराठी गटाने बाजी मारलीये. महापौरपदी किरण सायनाक यांची निवड झालीये तर उपमहापौरपदी मीना वाझ विजयी झाल्या आहेत. किरण सायनाक यांना 32 मतं पडली. तर त्यांच्याविरोधात असलेले कन्नड गटाच्या रमेश सोनटक्की यांना 26 मतं पडली.

बेळगाव महापालिका महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत मराठी गटाकडून नगरसेवक किरण सायनाक, मोहन बेलगुंदकर आणि विनायक गुंजतकर हे महापौर पदासाठी रिंगणात होते. तर कानडी उर्दू गटाकडून महापौरपदासाठी दीपक जमखंडी,रमेश सोनटक्की होते. तर उपमहापौर पदासाठी मराठी गटाकडून नगरसेविका मीना वाझ, माया कडोलकर तर कानडी गटाकडून जयश्री मलगी निवडणूक लढवत होते. पालिकेत एकूण 58 नगर सेवक व्यतिरिक्त 4 आमदार आणि एका खासदाराला मतदानाचा अधिकार होता. एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण मतदान संख्या 62 झाली. अखेरीस मराठी पारड्यात जास्त मत पडलीये. सर्वाधिक 32 मतांसह महापौरपदी किरण सायनाक विजयी झाल्या आहेत. गेल्या एक वर्षात मराठी भाषिक नगरसेवकांची सत्ता असूनही बेळगावचे बेळगावी झाले. असले तरी सभागृहात मराठी अस्मिता दाखवली गेली नव्हती. आता नव्या महापौरांनी आपण कर्नाटक सरकारशी याबाबत लढा देऊ, असं आश्वासन दिलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2015 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close