S M L

शाब्बास विद्यार्थ्यांनो, तयार केला कचरा उचलणारा रोबो !

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2015 06:18 PM IST

शाब्बास विद्यार्थ्यांनो, तयार केला कचरा उचलणारा रोबो !

robo407 मार्च : भुसावळमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कचरा उचलण्यासाठी अनोखा रोबोट साकारलाय. विविध टाकाऊ वस्तुंपासून या रोबोटची निर्मिती या विद्यार्थ्यांनी केलीये. हा रोबो 22 व्होल्टच्या बॅटरीवर रिमोटच्या साहाय्याने काम करतो. 10 कामगारांचे काम हा रोबो एकटाच करू शकतो.

भुसावळमधील संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी अनोखा रोबोट तयार केला आहे. या रोबोट तयार करायला टाकाऊ वस्तू वापरून निर्मिती केली आहे. हा रोबोट तयार करण्याकरिता 22 होल्टची बॅटरी रिमोटच्या साह्याने काम करतो. सफाई कर्मचार्‍यांच्या सतत कचर्‍याशी संपर्क येत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारे तंत्रज्ञाचा वापर केल्यास 10 कामगारांचे काम हा रोबो एकटाच करू शकतो. शिवाय शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागतो. या महाविद्यालयातील ब्लॅक ऍवार्ड्स ग्रुपच्या 10 विद्यार्थ्यांनी या रोबोची निर्मिती केली आहे. नुकताच अमरावती येथील राम मेघे महाविद्यालयात पार पडलेल्या क्लीन इंडिया ग्रीन इंडिया या स्पर्धेत हा रोबो प्रथम विजेता ठरला आहे. प्लास्टिक, ओला कचरा, घन कचरा इत्यादी कचरा संकलन करिता हा रोबो उपयुक्त ठरू शकतो. शिवाय यात लोह युक्त कचरा सुद्धा सहज जमा करू शकतो. त्या करिता चुम्बकाचा वापर या रोबोत करण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2015 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close