S M L

जैतापूर प्रकल्पाचं कार्यालय बंद पाडण्याचा सेनेचा इशारा

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2015 07:35 PM IST

Image img_140652_shivsena4_240x180.jpg07 मार्च : जैतापूर प्रकल्पाविरोधात शिवसेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जैतापूर प्रकल्पावरून भाजप-शिवसेनेत मतभेद आणखी तीव्र झाले आहे. या प्रकल्पाचं कार्यालय बंद करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी दिलाय. 16 मार्चला शिवसेना प्रकल्पाविरोधात मोर्चा काढणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

शिवसेनेनं अगोदरपासून जैतापूर प्रकल्पाला विरोध केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जैतापूर प्रकल्प हा स्थानिकांच्या हिताच्या विरोधी असून प्रकल्प होऊ देणार नाही असा पवित्रा घेतलाय. अलीकडेच शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जैतापूरला भेट दिली होती. प्रकल्पाला आमचा विरोध नसून लोकांच्या हितासाठी आम्ही विरोध करतोय असा खुलासा गीते यांनी केला होता. विशेष म्हणजे, शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. आता त्यात जैतापूर प्रकल्पाची भर पडण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2015 07:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close