S M L

एअर इंडियाचे पायलट संपावर जाण्याच्या तयारीत

26 सप्टेंबर नॅशनल एव्हिएशन कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच एअर इंडिया चालवणार्‍या कंपनीच्या 300 पायलट्सनी संपावर जायची धमकी दिली आहे. कंपनीतर्फे देण्यात येणारे इन्सेटिव्हज् 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्यानं पायलट्स नाखूश आहेत. एअर इंडियानं मात्र त्यांचे कोणीही पायलट्स संपावर नसल्याचं म्हटलं आहे. एअर इंडिया मॅनेजमेंटचे सदस्य असणार्‍या 9 पायलट्सनी शनिवारी एअर इंडियाच्या दीडशे आणि इंडियन एअरलाईन्सच्या 175 पायलट्सची एक बैठक बोलावली आहे. पण हे 9 पायलट्स मॅनेजमेंटचा हिस्सा असल्यानं ते युनियन तयार करू शकत नाहीत किंवा संपावरही जाऊ शकणार नाहीत. दरम्यान, एअर इंडियाची एक आंतरराष्ट्रीय आणि दोन डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तीन पायलट्सनी अचानक सीक लिव्ह घेतल्यामुळे या फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत. या फ्लाईट्सच्या प्रवाशांना स्पाईसजेटनं पाठवण्यात आलं. काहीच दिवसांपूर्वी जेट एअरवेजचे पायलट्सही आपल्या मागण्यांसाठी सामूहिक सुटीवर गेले होते. एअर इंडियाचे पायलट्स जर संपावर गेले तर त्याचा फटका सणासुदीच्या दिवसांत बसण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2009 09:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2009 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close