S M L

मुस्लीम आरक्षणाला यंदाच्या अधिवेशनात मुहूर्त नाही ?

Samruddha Bhambure | Updated On: Mar 9, 2015 10:02 AM IST

मुस्लीम आरक्षणाला यंदाच्या अधिवेशनात मुहूर्त नाही ?

08 मार्च :  मुस्लीम समाजाला फडणवीस सरकारने पुन्हा एकदा वार्‍यावर सोडलं आहे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. या अधिवेशनात 15 विधेयकं मांडली जाणार आहेत. पण, या अधिवेशनात सरकार मुस्लीम आरक्षणासंबंधी सुधारित आरक्षण मांडण्यात येणार नाहीये.

मुंबई हायकोर्टाने मुस्लीम आरक्षणाला अवैध ठरवताना शिक्षणामध्ये आरक्षण कायम ठेवायला राज्या सरकारला सांगितले होते. पण, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार्‍या विधेयकाची जी यादी सादर करण्यात आली, त्यात मुस्लीम आरक्षणासंबंधी सुधारित विधेयकाचं नाव नाही. एवढचं नाहीतर याबद्दल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तरही देण्यास टाळाटाळ केली.

आघाडी सरकारने काढलेला मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश युती सरकारच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात रद्द झाला होता. मुस्लिमांना आरक्षण देणारे विधेयक सरकारने त्या अधिवेशनात मांडले नाही. पण, मराठा आरक्षणाचा अध्यादेश रद्द होत असल्याने नवे विधेयक मांडून मराठा आरक्षण कायम केलं. इतकंच नाही तर 2 मार्चला सरकारने काढलेल्या जीआरमुळे राज्यातून मुस्लीम आरक्षण पूर्णपणे रद्द झालं असून हा विषय आता सरकारच्या अजेंड्यावरही नाही. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण लागू होणार की नाही, यावरही संभ्रम कायम आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2015 08:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close