S M L

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वादळी सुरूवात

Samruddha Bhambure | Updated On: Mar 9, 2015 03:44 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वादळी सुरूवात

09 मार्च :  आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर धरणं आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी 'आम्ही सारे पानसरे' अशा घोषणाही दिल्या, तसंच शेतकर्‍यांना लवकरांत लवकर मदत मिळाली पाहिजे, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात झाली. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी भाजपची कसोटी लागणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर फडणवीस सरकारला अनेक मुद्यांवरुन कोंडीत पकडण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. पण विरोधकांच्या हल्ल्याला तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचं फडणवीस सरकारने ठरवलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2015 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close