S M L

अशोक चव्हाणांच्या पदग्रहण समारंभाकडे नारायण राणेंची पाठ

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2015 07:02 PM IST

अशोक चव्हाणांच्या पदग्रहण समारंभाकडे नारायण राणेंची पाठ

09 मार्च : अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. पण, या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसमधली गटबाजी पुन्हा उघड झाली. या कार्यक्रमात माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली. पण, गेल्या आठवड्याभरापासून नाराज असलेले नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले नाहीत. त्यामुळे नारायण राणे यांची नाराजी दूर झाली नसल्याचं स्पष्ट झालंय.

अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी तर संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यावेळीच राणेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. ही घोषणा करताना आपल्याला विचारण्यात आलं नाही, असं राणेंनी म्हटलं होतं. त्यानंतर चव्हाण यांनी राणेंशी फोनवरून चर्चाही केली होती. पण, ही नाराजी काही दूर झालेली नाही, हे आजच्या कार्यक्रमावरून पुन्हा स्पष्ट झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2015 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close