S M L

बीडला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2015 10:14 PM IST

बीडला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

beed rain409 मार्च : बीड जिल्ह्यात आज संध्याकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला. दोन दिवस पूर्वीच जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला होता. आज परत पावसाने हजेरी लावली. मागील पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झाले होते. तसंच काढणीला आलेलं ज्वारीच मोठ नुकसान झालं होतं.

आज परत आंब्याचे आणि ज्वारीच नुकसान झालं आहे. कृषी विभागाच्या वतीने ज्वारी काढणीसाठी शेतकर्‍यांना वेळोवेळी सूचना करण्यात येत असून अजूनही अवकाळी पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी ज्वारी काढणी तसंच काढलेल्या कंसाचे  व्यवस्थापन तत्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंब्याचं मोठ नुकसान होतं असून यंदा आंब्याचं प्रमाण हे काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अवकाळी पावसाने मनुष्य हानी नाही मात्र पिकाचं अतोनात नुकसान झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2015 10:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close