S M L

पाथर्डीमध्ये दहावीचा बीजगणिताचा पेपर फुटला

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2015 05:11 PM IST

पाथर्डीमध्ये दहावीचा बीजगणिताचा पेपर फुटला

10 मार्च : राज्यभरात दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून प्रयत्न सुरू असले तरी या मोहिमेला हरताळ फासले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात दहावीचा बीजगणिताचा पेपर अर्ध्या तासात फुटला.

शिक्षक आणि पोलीस यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात कॉपीही होत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. एवढंच नाहीतर कॉपीसाठी व्हॉटसऍपचाही वापर करण्यात येतोय. विद्यार्थ्यांना पेपर व्हॉटसऍपवरून शेअर केले जात आहे.

तर दुसरीकडे कन्नड इथं कॉपी तयार करताना केंद्र प्रमुखालाच रंगेहात पकडलं गेलंय. ज्ञानेश्वर मेस्त्री असं केंद्र प्रमुखाचं नाव आहे. केंद्र प्रमुखासह 3 शिक्षकांनाही ताब्यात घेण्यात आलंय.

(संग्रहित छायाचित्र)

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2015 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close