S M L

'खळ्ळ-खट्याक'चा फुसका बार !

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2015 11:43 PM IST

'खळ्ळ-खट्याक'चा फुसका बार !

mns metro toadfoad10 मार्च : 'माझ्या आदेशाची वाट पाहू नका' असा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देऊन 24 तास उलटत नाही तेच मनसैनिकांनी खळ्ळ खट्याक सुरू केलंय. गोरेगावच्या आरे कॉलनीत मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलीये.

मेट्रो 3 च्या ऑफिसमध्ये ही मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. पण मनसेचं खळ्ळ खट्याक आंदोलन म्हणजे चिल्लर कार्यकर्त्यांची थिल्लरगिरीच म्हणावी लागेल असंच हे आंदोलन होतं.

चार ते पाच कार्यकर्त्यांनी मेट्रोच्या ऑफिसची तोडफोड केली. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आरे कॉलनीत मेट्रोचा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा देत आता यापुढे माझ्या आदेशाची वाट पाहू नका असा आदेशच कार्यकर्त्यांना दिला होता. त्याचीच कार्यकर्त्यांनी आज अंमलबजावणी केली खरी पण हसूही करून घेतलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2015 08:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close