S M L

हेलिकॉप्टरच्या अपघातात फ्रान्सचे 3 ऑलिम्पिकपटू ठार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 11, 2015 02:23 PM IST

हेलिकॉप्टरच्या अपघातात फ्रान्सचे 3 ऑलिम्पिकपटू ठार

11 मार्च :  अर्जेंटीनामध्ये एका रिऍलिटी शोच्या शुटिंगदरम्यान हेलिकॉप्टर्सची टक्कर झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत फ्रांसचे 8 नागरिक आणि अर्जेंटीनाचे दोन पायलट मृत्यूमुखी पडले. तर फ्रान्सच्या तीन ऑलिम्पिकपटूंचाही यात दुर्देवी मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान, ही दुर्घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

स्विमिंगचा गोल्ड मेडलिस्ट कॅमिलि मुफट, बॉक्सिंगचा ब्राँझ मेडलिस्ट ऍलेक्सिस वॅस्टिन आणि नौकापटू फ्लॉरेन्स ऑर्थरॉड यांच्यासह 10 जणांचा हेलिकॅप्टरच्या अपघातात मृत्यु झाला आहे. अर्जेंटिनामध्ये सोमवारी एका रिऍलिटी शोच्या शुटिंगदरम्यान दोन हेलिकॅप्टरचा समोरसमोर टक्कर झाल्याने हा भीषण अपघात झाला.

हे तिन्ही खेळाडू या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. मात्र या दुर्घटनेत त्यांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टर पूर्णत: जळून खाक झालं आहे. कमी प्रकाश आणि जोरात सुटलेल्या वार्‍यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर कोसळण्याचं नेमकं कारण काय याचा तपास केला जात आहे.

'आम्हाला या दु:खदायक घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. तसेच या महान क्रीडापटूंच्या कुटुंबियांसह त्यांच्या मित्रपरिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.'असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2015 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close