S M L

भारत खटवानी हत्येप्रकरणी अखेर पाच जणांना अटक

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2015 11:08 PM IST

napur attack11 मार्च : नागपुरातल्या भारत खटवानी हत्याप्रकरणी अखेर पोलिसांनी कारवाई केलीये. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी 5 जणांना अटक केलीय. खटवानी यांच्यावर गेल्या शनिवारी काही खंडणीखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला होता.

शहरातील सीताबर्डी इथल्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भारत खटवानी यांचं मोबाईल विक्रीचं दुकान आहे. खंडणी दिली नाही म्हणून शनिवारी दोन गुंडांनी दुकानात घुसून खटवानी यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला होता.

धक्कादायक म्हणजे दुकानात ग्राहक असताना गुंडांनी हा हल्ला केला होता. खटवानी यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. चार दिवसांत पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली नव्हती. पण, माध्यमांनी या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज दाखवल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी पाच दिवसांनंतर पाच जणांना अटक केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2015 11:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close