S M L

नवी मुंबईतील २० हजार अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Mar 12, 2015 02:39 PM IST

नवी मुंबईतील २० हजार अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार - मुख्यमंत्री

12 मार्च : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेली 20 हजार अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तिथल्या रहिवाशांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.

याशिवाय क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी 4 एफएसआय देण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरूवारी) विधानसभेत केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न रखडलेला होता.नवी मुंबई महापालिका हद्दीत 14 हजार अनधिकृत बांधकामं आहेत तर सिडको हद्दीत 6 हजार बांधकामं आहेत पुनर्विकासामुळे नियोजनबद्ध इमारती आणि रुंद रस्ते तयार होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाचा भाजपला किती फायदा होतो हे निकालंतर स्पष्ट होईल.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2015 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close