S M L

मुंबई पालिकेत राडा, सुरक्षारक्षक आणि नगरसेविकांमध्ये हाणामारी

Sachin Salve | Updated On: Mar 12, 2015 08:00 PM IST

मुंबई पालिकेत राडा, सुरक्षारक्षक आणि नगरसेविकांमध्ये हाणामारी

12 मार्च : काँग्रेस नगरसेविकांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आज मुंबई महापालिकेत मोठा राडा झाला. सुरक्षारक्षक आणि नगरसेविकांमध्ये महापालिकेच्या सभागृहाबाहेर झटापट झाली. यावेळी सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोपही या निलंबित नगरसेविकांनी केला.

घडलेली हकीकत अशी की, स्वाईन फ्लू हा ह्रदयाचा आणि फुफ्फुसाचा आजार आहे!!! वातावरण दूषित असल्यामुळे स्वाईन फ्लू सारखे आजार बळावतात आणि स्वाईन फ्लू डासांमुळे होतो आणि हा आजार आटोक्यात आणण्यासाठी झाडं लावली पाहिजे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी महापौर स्नेहल आंबेकर यांनी केलं होतं. त्यावरूनच विरोधकांनी आज महापौरांविरोधात आंदोलन केलं. त्यामुळे काँग्रेसच्या 6 नगरसेविकांना 15 दिवसांसाठी निलंबितही करण्यात आलं होतं. त्यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी महापौरांनी केली होती. या नगरसेविकांनी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी सभागृहात येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. पण त्यांचा प्रवेश रोखण्यात आला. त्यामुळे नगरसेविकांनी आज पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. यावेळी सुरक्षारक्षक आणि नगरसेविकांमध्ये झटापट झाली. सुरक्षारक्षकांनी नगरसेविकांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केलाय. आता या राड्यानंतर आता काँग्रेस नगरसेविकांनी महापौरांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे महापौरांना पदावहरून हटवण्याची मागणी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2015 08:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close