S M L

टोल वसुलीविरोधात सचिन तेंडुलकर मैदानात

Samruddha Bhambure | Updated On: Mar 13, 2015 04:41 PM IST

टोल वसुलीविरोधात सचिन तेंडुलकर मैदानात

13 मार्च :  गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील टोलनाक्यांचा प्रश्न पेटला असतानाच आता खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टोलविरोधात मैदानात उतरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सचिनने मुंबईकरांचा त्रास कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टोलचा प्रश्न चर्चेत आला आहे.

सचिनेने मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात मुंबई आणि ठाणे परिसरातील टोलनाक्यांच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. नवी मुंबई आणि ठाणे या शहरांतून मुंबईत येणार्‍या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकडे येणार्‍या महामार्गावरील वाढत्या टोलनाक्यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, अशी मागणी सचिनने या पत्रातून केली. टोल वसुलीच्या प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे टोलनाक्यांवर लोकांचा वेळे आणि इंधनाचा मोठ्याप्रमाणात वाया जात आहे. एवढचं नाही तर टोलनाक्यांवरच्या ट्रॅफिकमुळे ऍम्ब्युलन्सही अडकतात. या सगळ्यामुळे मुंबईकरांना शारिरिक आणि मानसिक अशा दोन्हीप्रकारचा त्रास सहन करत लागतो. त्यामुळे टोलनाक्यांचा फेरविचार केला जावा, अशी विनंती सचिन तेंडुलकरने या पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्यसभेतील खासदार झाल्यानंतर सचिनने पहिल्यांदाच एखाद्या सामाजिक प्रश्नाविषयी अशाप्रकारे जाहीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सचिनच्या या मागणीची सरकार दखल घेतली जाणार का, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तर या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2015 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close