S M L

सचिनच्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Mar 13, 2015 05:28 PM IST

cm devendra fadanvis413 मार्च : सचिन तेंडुलकर यांनी जे पत्र लिहलंय त्यात टोलबाबत समस्या सांगितल्या आहेत. त्याची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून संबंधीत विभागाला सुचना दिल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. टोलविरोधात आता खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात उतरलाय. सचिन तेंडुलकरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. टोल वसुलीच्या धोरणाचा फेरविचार करा, अशी विनंती सचिननं मुख्यमंत्र्यांना केलीय. 20 फेब्रुवारीला त्यानं हे पत्र लिहिलंय.

सचिनच्या पत्राबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खुलासा केला. सचिन यांनी पत्र लिहले त्यात टोलच्या समस्येबद्दल माहिती देण्यात आलीये. या अगोदर आघाडी सरकारने हवे तिथे टोल उभारले. याबद्दल आम्ही विधानपरिषदेत माहिती दिली. सचिनने लिहलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधीत विभागाला सुचना करण्यात आलीये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर, गेल्या दोन महिन्यांपासून सचिनच्या पत्रातील समस्येबद्दल आम्ही तयारी करतोय. मोठी वाहनं आणि छोटी वाहनं मोजणीमध्ये वेळ जात असल्यामुळे ट्रफिक जामची समस्या उद्भवत आहे. यावर तोडगा काढला जाईल. सचिनच्या पत्राशी आम्ही सहमत आहोत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर भाजपने सत्तेत आल्यावर टोलमुक्त महाराष्ट्र करणार अशी घोषणा केली होती, ती घोषणा अगोदर पूर्ण करावी असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2015 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close