S M L

प्रेम केलं म्हणून तरुणाची काढली नग्न धिंड

Sachin Salve | Updated On: Mar 13, 2015 06:47 PM IST

प्रेम केलं म्हणून तरुणाची काढली नग्न धिंड

अहमदनगर (13 मार्च): गावातच्या तरुणीशी प्रेम केलं म्हणून भर बाजारपेठेत एका अल्पवयीन तरुणाची नग्न करून धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या वांबोरी इथं घडलीये. गावातील 15 ते 20 जणांच्या टोळक्याने या तरुणाला बेदम मारहाण करून धिंड काढली. या प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आलीये.

वांबोरी इथं राहणार्‍या एका अल्पवयीन तरूणांचं गावातील वस्तीत राहणार्‍या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघे पळून गेले होते. तरुणाच्या कुटुंबियांनी आणि गावकर्‍यांनी दोघांचा शोध घेतला. दोघांनाही शोधून काल रात्री गावात आणण्यात आलंय. तरूणाला आणि तरुणीला यावेळी मारहाणही करण्यात आलीय. त्यानंतर गावकर्‍यांनी बैठक घेऊन तरूणाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी 15 ते 20 जणांच्या टोळक्याने तरुणाच्या घरी जाऊन त्याच्यासह त्याच्या आई-वडिलांनाही मारहाण केली. तरुणाचे कपडे फाडून, गळ्यात चपलांचा हार घालून नग्न धिंड काढण्यात आली. हा सगळा प्रकार सुरू असताना मात्र, उपस्थित गावकर्‍यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. अखेर गावच्या सरपंचानी धाव घटनास्थळी धाव घेऊन तरुणाची सुटका केली. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अखेरीस आज संध्याकाळी 12 जणांना अटक करण्यात आलीय. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे एसआरपी आणि पोलीस तैनात करण्यात आले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2015 06:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close