S M L

अखेर भातसा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणार !

Sachin Salve | Updated On: Mar 13, 2015 07:00 PM IST

अखेर भातसा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणार !

bhatsa44ठाणे (13 मार्च) : गेल्या 47 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भातसा धरण प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय मिळालाय. आता या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.

भातसा धरण प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय मिळाला. गेली 47 वर्ष भातसा धरण प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झाले नव्हतं. त्यांचं आता मुंबई महापालिका पुनर्वसन करणार आहे. तसंच त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला मुंबई महापालिकेत नोकरीही देण्यात येणार आहे. येणार्‍या भरतीमध्ये भातसा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत आयुक्त आणि महापौर यांच्या सोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. बैठकीनंतर भातसा धरण प्रकल्पग्रस्तांनीही समाधान व्यक्त केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2015 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close