S M L

उत्सव मंडळांना रस्त्यावर मंडप उभारण्यास हायकोर्टाची बंदी

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2015 03:09 PM IST

उत्सव मंडळांना रस्त्यावर मंडप उभारण्यास हायकोर्टाची बंदी

14 मार्च : सण समारभांच्या काळात रस्त्यावर लाऊडस्पीकर लावून मंडप उभारणीला मुंबई हायकोर्टाने बंदी घातलीय. कोर्टाच्या या आदेशामुळे सार्वजनिक मंडळांच्या उत्सवांवरती एकप्रकारे मर्यादा येणार आहे. सरकारनं याबाबत तात्काळ नवीन धोरण जाहीर करावे, असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.

उत्सव मंडळांकडून रस्त्यावर उभारल्या जाणार्‍या विनापरवाना मंडपांविरोधात दाखल असलेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने हा आदेश काढलाय. पण हायकोर्टाने या निर्णयामुळे सार्वजनिक उत्सवांवरच गदा येऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक उत्सव मंडळांकडून कोर्टाच्या या आदेशावरून प्रचंड नाराजी व्यक्त होतेय. तसंच कोर्टाच्या आदेशामुळे मंडप उभारण्याच्या परवानगीसाठीचे पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडील अधिकारही संपुष्टात येणार आहेत. एवढंच नाहीतर मंडळांविरोधात तक्रार करणार्‍यांना पोलिसांनी संरक्षण द्यावं, असंही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय.

कोर्टाने आपल्या आदेशात नेमकं काय म्हटलंय ?

- लाऊडस्पीकर लावून मंडप उभारणीला हायकोर्टाची बंदी

- मंडप उभारण्याच्या परवानगीसाठीचे पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडचे अधिकारही संपुष्टात

- सरकारनं याबाबत तात्काळ नवीन धोरण जाहीर करावे

- मंडळांविरोधात तक्रार करणार्‍यांना पोलिसांनी संरक्षण द्यावं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2015 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close