S M L

पिंपरी-चिंचवडच्या महापौर करतायत बंडखोराचा प्रचार

30 सप्टेंबर पुण्यात चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात चक्क राष्ट्रवादीच्याच महापौरांनी भाग घेतला. पुण्यातल्या जागावाटपात चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला मिळाला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी केली आहे. जगताप हे अजित पवारांचे जवळचे आहेत. या बंडखोर उमेदवाराच्या प्रचाराच्या रॅलीत बुधवारी चक्क पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या महापौर अपर्णा डोके सामील झाल्या होत्या. काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. पण इथं आघाडीचा धर्म फक्त कागदावरच आहे. त्यातच जगताप यांनी माघार घ्यावी, यासाठी अजित पवारांनी कोणतेच प्रयत्न न केल्याची चर्चा आहे. महापौर डोकेंप्रमाणेच राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक जगताप यांचा खुलेआम प्रचार करतायत. याबाबत डोके यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी बोलण्याचं टाळत चक्क पळ काढला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 30, 2009 10:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2009 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close