S M L

तरुणाची नग्न धिंड प्रकरणी 17 जणांना अटक, 26 जणांवर गुन्हे

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2015 02:00 PM IST

nagar wambori14 मार्च : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतल्या तरुणाची नग्न धिंड काढल्याप्रकरणी 17 जणांना अटक करण्यात आलीय. 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर इतर संशियतांचा तपास सुरू आहे.

अटक केलेल्या 17 जणांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री राम शिंदे यांनी आज पीडित कुटुंबाला भेट देणार आहेत.

राहुरी तालुक्यातील वांबोरी गावातल्या तरुणाचे गावातल्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. हे दोघंही दोन दिवसांपूर्वी गावातून पळून गेले होते.

गावकर्‍यांनी या दोघांना गावात परत आणलं होतं. त्यानंतर गावातल्या काही लोकांनी मुलाच्या घरी जाऊन मुलासह त्याच्या आईवडिलांना मारहाण केली. आणि त्यानंतर या मुलाची धिंड काढण्यात आली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2015 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close