S M L

निर्मल यांच्या बदलीला विरोध

30 सप्टेंबर निर्मल यांच्या बदली विरोधात भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत मोर्चाचं नियोजन केलं होतं. पण हा मोर्चा पोलिसांनी रोखला. मोर्चात सहभागी झालेले भाजप उमेदवार प्रमोद जठार, आमदार अजित गोगटे, शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांच्यासह सुमारे 200 हून जास्त कार्यकर्त्यांना अटक झाली. नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. कणकवली पोलीस स्टेशनचे एपीआय रजनीश निर्मल यांच्या बदलीमुळं कणकवलीतलं राजकारण चांगलंच तापलं आहे.संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोकोही केला. विशेष म्हणजे निर्मल यांच्या बदलीबाबत कोणतीही परवानगी किंवा अहवाल आपल्याकडे आला नसल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक हे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 30, 2009 10:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2009 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close