S M L

पुन्हा 'अवकाळी'ने झोडपले

Samruddha Bhambure | Updated On: Mar 15, 2015 05:47 PM IST

पुन्हा 'अवकाळी'ने झोडपले

15 मार्च :  नाशिक जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील काही भागाला शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करावा लागला. दिंडोरी तालुक्यात गुरुवारनंतर पुन्हा शुक्रवारी रात्री देखील मुसळधार पावसासह तुफान गारपीट झाली. येवला, नांदगाव आणि जिल्ह्याच्या इतर भागांतही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादकांचा निसर्गाने घात केला. आतापर्यंत सुमारे 2000 हेक्टरवर द्राक्षांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातीत 20 ते 25 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज वर्तवला जातं आहे. अनेक शेतकर्‍यांनी 4 ते 5 लाख रुपये गुंतवून द्राक्षाचं पिक घेतलं होतं. ते आता डोळ्यासमोर खराब होताना दिसतय. या गारपीटीने नाशिकमधील रब्बी पिकांचे तसेच फळांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिक एवढं सडतंय की निर्यातदार तर सोडाच, स्थानिक बाजारातही त्याला मागणी नाही. दिंडोरी तालुक्यात काही भागात सहा इंचाचे गारांचे थर साचले होते. रात्री उशिरापर्यंत अवकाळीचे थैमान सुरूच होते. गहू, कांद्यासह भाजीपाल्यांचेही नुकसान झाले आहे.

नगर जिल्ह्यातही गारपिटीमुळे नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यालाही गारपिटीचा तडाखा बसला आहे. कोपरगाव तालुक्यात गेल्या वर्षरात तिसर्‍यांदा गारपीट झाली आहे. नगहर शहरातही रात्री विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. लाखगंगा, बाबतारा, डोणगाव, हिगोंंणी, कांगोणी, पुरणगाव, सावरखेडगंगा, कापुसवाडगाव, किरतपुर, नगिना-पिंपळगाव, गोयगाव, भोर-नारायणपूर गावांना वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस, काही प्रमाणात एक फुटांपर्यत गारांचा थर साचलाय. वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडल्यानं अनेक घरांची पत्रे उडाली आहेत. अनेक जनावरं जखमी झाली आहेत. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, बियाण्यांसाठी ठेवलेले डोंगळे कांदे, कापूस, फळबागा, द्राक्षे, चिक्कु, भाजीपाला, जनावरांसाठीचे कडवळ अशा पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने हिरावून घेतला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2015 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close