S M L

अविश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर झाल्यास...

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2015 05:38 PM IST

vidhan16 मार्च : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अविश्वास ठराव मांडलाय. त्यावर सध्या विधान परिषदेत चर्चा सुरू आहे. त्यानंतर मतदान होणार आहे. पण जर शिवाजीराव देशमुख अविश्वास ठराव हरले तर साहजिकच संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी सभापतीपदावर दावा करू शकते.

या पदासाठी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर याचं नाव सर्वात पुढे आहे. तर उपसभापतीपदासाठी सध्याचेच वसंत डावखरे आणि हेमंत टकले यांच्यात रस्सीखेच आहे. पण या अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी भाजपने राष्ट्रवादीला मदत केली तर साहजिकच उपसभापदीपद हे भाजपला दिलं जाऊ शकतं. उपसभापतीपदासाठी भाजपकडून पांडुरंग पुंडकर यांच्या नावाची चर्चा आहे. पण ते या पदासाठी उत्सुक नाही त्यांना मंत्रीपद हवंय. समजा त्यांनी नकार दिला तर ज्येष्ठतेनुसार शोभा ताई फडणवीस यांचा उपसभापतीपदासाठी नंबर लागू शकतो..पाहुयात ऐनवेळी नेमकं काय होतंय. ते....

या अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी कोणता पक्ष काय भूमिका घेऊ शकतो याची शक्यता

शिवसेना - तटस्थ

भाजप - बाजूनं मतदान

लोकभारती, आरपीआय(कवाडे गट) विरोधात

शेकाप - राष्ट्रवादीला पाठिंबा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2015 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close