S M L

गँगस्टर अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 17, 2015 09:56 AM IST

Image img_214892_arungawali34234_240x180.jpg17 मार्च : गँगस्टर आणि अखिल भारतीय सेनेचा अध्यक्ष अरुण गवळी याला सोमवारी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात नागपुरात आणण्यात आले. वर्धा मार्गावरील मध्यवर्ती कारागृहातील हाय सीक्युरिटी सेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणात विशेष मोक्का कोर्टाने गवळीला जन्मठेप आणि 18 लाखांचा दंड ठोठावला होता. याप्रकरणात कोर्टाने गवळी याच्या अन्य 10 साथीदारांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 30 लाख रुपयांची सुपारी घेऊन नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्याचे कारस्थान रचणे, त्याची पूर्वतयारी करणे आणि हत्येची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून त्याचे समर्थन करणे, हे आरोप गवळीवर सिद्ध झाले होते. तो नागपुरात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

गवळी याच्यावर तळोजा इथल्या एका प्रकरणातही खटला चालू आहे.  याप्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला मुंबईत आणण्यात आलं होतं. सुनावणी संपल्यानंतर त्याला अत्यंत कडेकोट बंदोबस्तात नागपुरात नेण्यात आलं आहे. मोक्का कायद्याखाली जन्मठेपेची शिक्षा झालेला गवळी हा गुंड टोळीचा पहिलाच प्रमुख आहे. भल्या सकाळी पोहोचला अत्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्तात सोमवारी सकाळी सात वाजता गवळी सशस्त्र जवानांच्या गराड्यात मध्यवतच् कारागृह परिसरात पोहोचला. यावेळी परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. कारागृह प्रशासनानेही गवळीला सोमवारी कारागृहात आणण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, खंडणी, खून, अपहरण आदी गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड अरुण गवळी याला 'डॅडी' नावाने ओळखलं जातं. अरुण गवळी गँगची आजही मुंबईत दहशत असून त्याच्या दगडी चाळीत परवानगीशिवाय पोलिसांनाही शिरता येत नाही. मध्यंतरी त्याने राजकारणात प्रवेश केला होता. गवळी सेना नावाची संघटना स्थापन केली होती. मुंबईतून तो निवडून आला होता. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात एक एसी बस घेऊन तो आला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2015 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close