S M L

राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती ?

Samruddha Bhambure | Updated On: Mar 17, 2015 11:26 AM IST

राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती ?

phaltan_RAJA_BAHADUR_SHRIMANT_RAMRAJE_NAIK_NIMBALKAR_117 मार्च : शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याने सभापतीपद आता राष्ट्रवादीला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ सदस्य रामराजे निंबाळकर यांच्या नावाची या पदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. निंबाळकर हे शरद पवार यांच्या खास मर्जीतील मानले जातात

विधान परिषदेच्या सभागृहात सर्वाधिक 28 संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे सभापती पदासाठी राष्ट्रवादीने दावा केला आहे. तक सभापतीच्या बदल्यात राष्ट्रवादीला सध्याचं उपसभापती पद सोडावं लागणार असून भाजपला हे पद मिळण्याची शक्याता आहे. तसं झाल्यास भाजप उपसभापतीसाठी पांडुरंग फुंडकर यांना पुढे करण्याची शक्यता आहे.

फुंडकर यांनी उपसभापती या पदा नाकार दिला तर त्या पदासाठी विदर्भातीलच शोभा फडणवीस यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी असलेले फुंडकर यांना मंत्रिपद देण्यात येईल, असं वाटत होते. मात्र, त्यांचा समावेश झाला नसल्याने ते सध्या नाराज आहेत. उपसभापतिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं बोललं जात आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार फुंडकर हे पद घेण्यास नाराज असून ते मंत्रिपदासाठीचं उत्सूक अल्याचं म्हटलं जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2015 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close